This download link is referred from the post: NIOS 10th Class (Secondary) Last 10 Years 2010-2020 Previous Question Papers || National Institute of Open Schooling
Firstranker's choice
This Question Paper consists of 37 questions and 8 printed pages.
--- Content provided by FirstRanker.com ---
ह्या प्रश्नपत्रिकेत एकूण 37 प्रश्न आणि 8 छापील पाने आहेत.
Roll No. अनुक्रमांक | Day and Date of Examination (परीक्षेचा दिवस आणि तारीख) |
Signature of Invigilators
(निरीक्षकाची सही)
--- Content provided by FirstRanker.com ---
- MARATHI
(मराठी) (204)सामान्य अनुदेश :
-
- परीक्षार्थीने प्रश्नपत्रिकेच्या प्रथम पृष्ठांवर आपला अनुक्रमांक लिहावा.
- कृपया करुन प्रश्न-पत्र तपासून घ्या की पुस्तकाचे एकंदर पृष्ठ आणि प्रश्नांची संख्या प्रथम पृष्ठावर सर्वात वर छापलेली आहे, तेवढीच आहे किवा नाही. तसेच प्रश्नांची संख्या पण क्रमिक रुपात असावी.
- बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर देतांना तुम्हाला दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडावयाचा आहे. वेगळी देण्यांत येणाऱ्या उत्तर-पुस्तिकांमध्ये योग्य उत्तर लिहायचे आहे.
- बहुपर्यायी प्रश्नांचे सोबतच सर्व प्रश्नांची उत्तरे निर्धारित वेळेतच द्यावयाची आहेत. बहुपर्यायी प्रश्नांसाठी जास्त वेळ देण्यात येणार नाही.
- उत्तर-पत्रिकेत ओळख निदर्शनास आणणे आणि योग्य जागेच्या व्यतिरिक्त अनुक्रमांक लिहल्यास परिक्षार्थीला अयोग्य ठरविण्यात येईल.
- आपल्या उत्तर-पत्रिकांवर प्रश्न-पत्रिकेचा कोड संख्या 51/S/O/M लिहावेत.
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
FirstRanker.com
Firstranker's choice
वेळ : तीन तास
एकूण गुण : 100
निर्देश :
--- Content provided by FirstRanker.com ---
MARATHI
(मराठी) (204)
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- सर्व प्रश्न लक्षपूर्वक वाचून मगच प्रश्नाचे उत्तर द्यावे.
- प्रश्न 1 ते 11 पर्यंत प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडून लिहावा.
--- Content provided by FirstRanker.com ---
- "झेल्या चुणचुणित व हुशार मुलगा असल्याचे कोणाच्या लक्षात आले'?
- त्याच्या मित्राच्या
- मास्तरांच्या
- मुख्याध्यापकांच्या
- वडिलांच्या
- "स्वभाषेची अभिवृद्धी" या धड्याचे लेखक कोण?
- लोकमान्य टिळक
- ग.दि. माडगुळकर
- ना.सी. फडके
- महात्मा गांधी
- पुढे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय ओळखा.
- आर्शीवाद
- आशीर्वाद
- आशिर्वाद
- अशिर्वाद
- खालील काव्यपंक्तीतील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा - "दुरितांचे ______ जावो । विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ॥
- अज्ञान
- तिमिर
- अंधार
- भय
- पुढीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण आले आहे?
- ललिता कविता लिहिते.
- सुंदर मुलगी पाहून तिला आनंद झाला.
- कावळा कोकत होता.
- हरीश शाळेला गेला.
- प्रत्येक जण पिल्लाशी कसे बोलत असे?
- टोचून
- रागावून
- धिक्कारून
- तुच्छतेने
- शब्दांच्या जाती किती?
- आठ
- पाच
- सहा
- नऊ
- 'पुरोपकंठी' या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायांमधून ओळखा.
- नगराच्या सीमेवर
- रानात
- गावी
- लग्नानंतर नागू गवळ्यास झोप येत नसे, कारण :
- त्याच्या मागे प्रपंच लागला
- त्याला व्यायामाला वेळ द्यावा लागत होता.
- गोंधळ चालत असे.
- त्याची धाडसाची कामे वाढली होती.
- 'कापणी' या कवितेत बोणं म्हणजे काय?
- चूल
- भाकरी
- तांदूळ
- गहू
- आपल्याला ज्ञान देणारा पहिला गुरु कोण?
- आई
- शिक्षक
- पिता
- ग्रंथ

- संभाजी राजाला रामदासांनी पत्रातून काय कळविले?
- खालील वाक्यातील क्रियापद ओळखा व त्याचा काळ कोणता ते सांगा?
- काल पाऊस आला.
- पुढच्या सोमवारी तिचे लग्न होईल.
- योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा
--- Content provided by FirstRanker.com ---
रमाकाकू सीताबाईंच्या नावाने ______ होत्या. - श्यामरावांनी सांगितलेले डोंबाऱ्यांचे मूळचे व्यवसाय कोणते ?
- नामस्मरणाने भक्त प्रल्हादाला काय मिळाले?
- खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय वापरले आहे?
- त्याने अभ्यास केला नाही. तो तो नापास झाला.
- त्याने अभ्यास कसा संपवला.
- त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला.
- त्याने अभ्यास केला तो पास झाला.
- डॉ. हेडगेवार यांनी कोणत्या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली?
- कवी नक्षत्रांना कोणता प्रश्न विचारतो?
- डॉ. ह्यूम यांनी टिळक कुटुंबियांसाठी वेगळा डबा कां रिझर्व केला?
- पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द सूचवा :
- कधीही मृत्यू न येणारा
- विद्यार्थ्यांसाठी राहाण्याची जागा
- पुढीलपैकी एका म्हणीचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
- नाचता येईना अंगण वाकडे
- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
--- Content provided by FirstRanker.com ---
- (अ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा :
- पक्षी
- राजा
- अनुकूल
- धर्म
- आस्तिक
- कीर्ती
--- Content provided by FirstRanker.com ---
- खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा :
--- Content provided by FirstRanker.com ---
अर्थस्य पुरुषो दासः। हे काही महाभारतात भीष्माच्या तोंडून सहजासहजी आलेले एक साधे सुभाषित नाही. मानवी जीवनातील एका अत्यंत कटू सत्यावर विदारक प्रकाश टाकणारा विद्युतदीप आहे तो. ज्या भीष्माने आयुष्याच्या पूर्वार्धात पित्याकरिता स्त्रीसुखाचा त्याग केला होता त्याला काही आयुष्याच्या उत्तरार्धात दुर्योधनाच्या दुष्टपणाला आळा घालता आला नाही. पैसा कधीच कुणाचा गुलाम होत नाही. तो मोठमोठ्या कवींना आणि तत्त्वज्ञांना आपला गुलाम करून शाम करून सोडतो. भीष्मापुढे दोन मार्ग होते. एक द्रौपदीची बाजू घेऊन दुर्योधनाचा धिक्कार करायचा किंवा मूग गिळून आपल्यापुढे चाललेली एका पतिव्रतेची विटंबना म्हाताऱ्या डोळ्यांनी बघत बसावयाचे. पहिला मार्ग धैर्याचा, नीतीचा तर दुसरा मार्ग गुलामगिरीचा, अनीतीचा होता. जगातली बुद्धी जोपर्यंत सत्तेची, संपत्तीची, अन्यायाची गुलामगिरी करण्यात आनंद मानीत आहे, तोपर्यंत यात फरक कसा पडावा?
(वि.स. खांडेकर)प्रश्न :
- भीष्म कोणत्या कठोर कर्तव्यापासून परावृत्त झाला? केव्हा?
- दुर्बलांना न्याय न मिळण्याचे कोणते कारण लेखकाने सांगितले आहे?
- वरील उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
--- Content provided by FirstRanker.com ---
- खालील पद्यांश वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा :
जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले ॥ 1 ॥
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा | 2 ||
मृदु सबाघ्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त | 3 |--- Content provided by FirstRanker.com ---
ज्यासि आपंगिता नाही। त्यसी धरी जो हृदयी ॥ 4 ॥
दया करणे पुत्रासी। तेचि दासा आणि दासी ॥ 5 ॥
तुका म्हणे सांगू किती। त्याचि भगवंताच्या मूर्ती ॥ 6 ॥प्रश्न :
- सज्जन लोकांचे मन कसे असते?
- खरा साधू कसा ओळखावा?
- देव स्वरूप माणसे कोणाला म्हटले आहे?
--- Content provided by FirstRanker.com ---
- खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : (अ) बोणं म्हणजे काय? ते कशासाठी शिजवले जाते?
(ब) राज्यस्थापनेच्या कार्यास कसे वाहून घ्यावे, असे रामदास स्वामी म्हणतात? - (अ) देशाचा भाग्यसूर्य तळपत ठेवण्यासाठी कवी देशबांधवांना काय करायला सांगतो?
--- Content provided by FirstRanker.com ---
(ब) 'पहा टाकिले पुसुनि डोळे' या कवितेतील देशबांधवांना उद्देशून एक पत्नि आपल्या शूर पतीस काय सांगते? कवयित्रीचे नाव लिहा. - (अ) वि.स. खांडेकरांचे अपरिग्रह व्रत कोणते?
(ब) कोणत्या गोष्टीमुळे कवीचे भान हरपून गेले? - (अ) 'पसायदान' म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी कुणाकडे पसायदान मागितले? त्यांच्या गुरुचे नाव काय होते ?
(ब) प्रा.टी. तोताद्री आयंगार यांना खऱ्या अर्थाने गुरू असे, डॉ. कलाम कां म्हणतात? - (अ) लेखकाच्या मनात कन्याकुमारीच्या देवीबद्दल कोणते विचार आले?
(ब) कवीला कोणत्या गोष्टी प्रिय वाटतात व कां? - (अ) सूर्याकडे पाठ फिरवून शतकांचा प्रवास कुणी व कसा केला? कवितेचे व कवीचे नाव लिहा.
(ब) संत तुकाराम महाराजांचे थोडक्यात व्यक्तिचित्र रेखाटा. - तुम्ही व तुमच्या मित्राने एक बोधपर चित्रपट बघितला. तुम्हा दोघांना तो कसा वाटला याविषयी संवाद 8 ते 10 वाक्यात लिहा.
- खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. शब्द मर्यादा 200.
- नदीचे आत्मवृत्त
- शिक्षणाचे महत्त्व
- माझ्या स्वप्नातील भारत
- मी मुख्याध्यापक झालो तर
- तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणता धडा तुम्हाला अधिक आवडला? कां? त्या धड्याचे व लेखकाचे नाव लिहा.
- सातवीत शिकणारा तुमचा भाऊ अभ्यास करणे टाळतो. त्यास पत्राने अभ्यासाचे महत्त्व कळवा.
किंवा
तुमच्या जवळच्या नगरपालिका अधिकाऱ्यास पत्राने घराजवळचा कचरा व घाण साफ करण्याविषयी कळवा. - पुढील उतारा लक्षपूर्वक वाचा व स्वतःच्या शब्दात त्याचा 1/3 सारांश लिहा.
--- Content provided by FirstRanker.com ---
विद्येने मनुष्याला श्रेष्ठत्त्व येते असे समजले जाते. काही जण पैशाने मनुष्याला श्रेष्ठत्त्व येते असे म्हणतात. हे दोन्ही थोडे फार खरे आहे. पण लोकशाहीत सेवाव्रतापेक्षा सत्तेनेच श्रेष्ठत्त्व येते असे वाटते. 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्त्व जगामाजी' असे एका कवीने म्हटले आहे व तोच पुढे म्हणतो की, एकही वस्तू वा गोष्ट अशी नाही की जी विद्येने असाध्य आहे. पण ही गोष्ट त्या कवीच्या वेळी होती. आता जमाना पालटला आहे. 'पैशानेच मनुष्या आले श्रेष्ठत्त्व या जगामाजी' अशी स्थिती आहे. त्याही पुढे लोकशाहीत सत्तेनेच मनुष्याला श्रेष्ठत्त्व येते, यावर विचार करतांना मती गुंग होते. - खालील माहितीच्या आधारे तालिका बनवा.
विनयने आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक करायचे ठरविले. सकाळी 6 ते 8 असे दोन तास व संध्याकाळी 8 ते 10 असे दोन तास एकूण चार तास रोज अभ्यास करतो, गणित, विज्ञान व इंग्रजी यांचा अभ्यास सकाळच्या वेळेत तर मराठी, हिंदी व सामाजिक ज्ञान यांचा अभ्यास संध्याकाळच्या वेळेत करायचा त्याने ठरविले व रविवारी सर्व विषयांची उजळणी करावी असे ठरविले त्याचे वेळापत्रक आखण्यासाठी तालिका तयार करा.