This download link is referred from the post: NIOS 10th Class (Secondary) Last 10 Years 2010-2020 Previous Question Papers || National Institute of Open Schooling
Firstranker's choice
--- Content provided by FirstRanker.com ---
This question paper consists of 37 questions and 8 printed pages.
ह्या प्रश्नपत्रिकेत एकूण 37 प्रश्न आणि 8 छापील पाने आहेत.
--- Content provided by FirstRanker.com ---
Roll No. | Code No. |
अनुक्रमांक | 50/S/A/M |
--- Content provided by FirstRanker.com ---
Day and Date of Examination (परीक्षेचा दिवस आणि तारीख)
Signature of Invigilators 1. | (निरीक्षकाची सही) |
2. |
MARATHI (मराठी) (204) SET A
सामान्य अनुदेश :
--- Content provided by FirstRanker.com ---
- परीक्षार्थीने प्रश्नपत्रिकेच्या प्रथम पृष्ठांवर आपला अनुक्रमांक लिहावा.
- कृपा करून प्रश्न-पत्र तपासून घ्या की पुस्तकाचे एकंदर पृष्ठ आणि प्रश्नांची संख्या प्रथम पृष्ठांवर सर्वात वर छापलेली आहे, तेवढीच आहे किंवा प्रश्नांची संख्यापण क्रमिक रूपात असावी.
- बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर देतांना तुम्हाला दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडावयाचा आहे. वेगळी देण्यांत येणाऱ्या उत्तर-पुस्तिकांमध्ये योग्य उत्तर लिहायचे आहे.
- बहुपर्यायी प्रश्नांचे सोबतच सर्व प्रश्नांची उत्तरे निर्धारित वेळेतच द्यावयाची आहेत. बहुपर्यायी प्रश्नांसाठी जास्त वेळ देण्यांत येणार नाही.
- उत्तर-पत्रिकेत ओळख निदर्शनास आणणे आणि योग्य जागेच्या व्यतिरिक्त अनुक्रमांक लिहल्यास परीक्षार्थीला अयोग्य ठरविण्यात येईल.
- आपल्या उत्तर-पत्रिकांवर प्रश्न-पत्रिकेचा कोड संख्या 50/S/A/M, Set A लिहावेत.
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
Firstranker's choice
--- Content provided by FirstRanker.com ---
MARATHI मराठी (204) [ एकूण गुण : 100 वेळ : तीन तास ]
निर्देश : (1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. (2) सर्व प्रश्न लक्षपूर्वक वाचून मगच प्रश्नाचे उत्तर द्यावे. (3) प्रश्न 1 ते 11 पर्यंत प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडून लिहावा.
--- Content provided by FirstRanker.com ---
- झेल्याने खिशात काय ठेवले होते ? (A) चिंचा (B) बोरे (C) आवळे (D) कैऱ्या
- टिळकांच्या मते आपण मराठी भाषेचा स्वीकार केला आहे कारण (A) ती इंग्रजीपेक्षा चांगली आहे. (B) मराठी भाषा आपल्याला आवडते. (C) ती आपल्याला जन्माबरोबर प्राप्त झाली आहे. (D) मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे.
- खालील काव्य पंक्तीतील रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा – 'जगतास ______ देईल.' (A) शांति (B) मुक्ति (C) क्रांती (D) सेवा
- कवी इंद्रधनुष्याचे वर्णन कोणत्या शब्दात करतो ? (A) गोफ (B) तोरण (C) साखळी (D) पताका
- धर्मशास्त्राप्रमाणे आईचे स्थान कुणाच्या ठिकाणी आहे. (A) देवाच्या (B) गुरुच्या (C) पालकाच्या (D) मैत्रिणीच्या
- लग्नापूर्वी नागू गवळी कसा होता ? (A) झोपाळू (B) उत्साही (C) दुःखी (D) विनोदी
- पाण्यात पाहताना एके दिवशी पिल्लास काय कळाले ? (A) तो एक राजहंस आहे. (B) तो एक कुरूप बदक आहे. (C) तो आपल्या भावडांपेक्षा सुंदर आहे. (D) तो इतरांपेक्षा निराळा आहे.
- पुढील काव्यपंक्ती योग्य पर्याय भरून पूर्ण करा "______ शपथ घालितो तुजला.” (A) भूमातेची (B) गळ्याची (C) नदीची (D) तद्विरहाची
- शेतकरी आत्महत्या करीत नाही कारण (A) कुटुंबातील बायका पोरे निराधार होतील. (B) तो सुखात होता. (C) त्याला जगण्याची जबर इच्छा होती. (D) चे गाऱ्हाणे अधिकाऱ्यांनी ऐकले होते.
- शेतकरी शेतात कुणाची पूजा करतात ? (A) देवाची (B) ढेफळांची (C) बैलांची (D) अवजारांची
- खालील काव्यपंक्तीतील रिकामी जागा योग्य पर्यायाने भरा – "अखंड सावधान असावे । ______ कदापि नसावे.” (A) निश्चित (B) सचिंत (C) स्थिरचित्त (D) दुश्चिंत
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
- डोंबारी कसे जीवन जगत आहेत ?
- लग्नापूर्वी नागूचा कार्यक्रम काय होता ?
- खालीलपैकी कोणत्याही एका म्हणीचा वाक्यात उपयोग करा (i) आकाश पाताळ एक करणे. (ii) कानामागून आली तिखट झाली.
- खालीलपैकी कोणतेही दोन शब्द शुद्धस्वरूपात लिहा (i) तेव्हढा (ii) सिंव्ह (iii) इर्ष्या (iv) मनुश्य
- अंधार वाहून वाहून कोण पोक्या झाले ?
- 'ईश्वराची पाऊले कधी दिसलीत कां,' या कवीच्या प्रश्नाला चांदण्या काय उत्तर देतात ?
- वि.दा. सावरकर कवी सागरास नदीची शपथ कां घालतो ?
- मास्तरांच्या घरी झेल्या कोण कोणती कामे करी ?
- पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द (i) परमेश्वराचे अस्तिव मानणारा (ii) इच्छिलेले देणारा वृक्ष
- खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय वापरले आहे ? (A) विनोदने अभ्यास केला नाही, तो नापास झाला. (B) विनोदचे मन अभ्यासात रमेना. (C) त्याने चांगला अभ्यास केला म्हणून तो पास झाला. (D) पास झाल्याचा सर्वांना आनंद झाला.
- पुढील वाक्यांचा काळ ओळखा. (A) आकाशात काळे ढग आहेत. (B) सौरभ अमेरिकेला गेला.
- (अ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा. (i) भरपूर (ii) सूर्य (ब) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (i) स्तुती (ii) धीट (iii) कीर्ती (iv) जड
- खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या भाषेत लिहा मराठी भाषा मरणोन्मुख झाली आहे, असे कुणीच म्हणणार नाही. तिची प्रकृती कदाचित राहावी तितकी बरोबर राहात नसेल. शास्त्रीय वाङ्मयाचा व्यायाम घेण्याचा तिला कंटाळा आहे. प्रेमाची खमंग फोडणी दिलेले पदार्थच मराठी भाषेला फार आवडतात. तिची वेशभूषा अगदी आजच्या घटकेला शोभणारी असली तरी मन मात्र अजून मागच्या काळातच रेंगाळत आहे, इ. आक्षेप मराठी भाषेवर घेतले. स्थिर झाले आहे अशा ललित लेखकांनी आपल्या आवडीचे वाङ्मय निर्माण करण्याचे ठरविले तर ते काय त्यांना अशक्य आहे ? 'गरज तसा पुरवठा' हे तत्त्व मला वाङ्मय क्षेत्रातही मान्य आहे. पण ते पाळतांना लेखकांनी व्यापारी होऊ नये. डॉक्टर व्हावे. रोग्याच्या शरीराला ज्या द्रव्याची जरूरी असते. ती ती औषधाच्या व्दारे त्याला देणे हेच तत्वही प्रसिद्ध आहे. म्हणजे पुरवले जातात. ज्यांचे आसन सरस्वति मंदिरात डॉक्टरांचे कर्तव्य नव्हे काय ? शिवाय 'गरज तसा पुरवठा' या तत्त्वाइतकेच 'गरज ही कल्पकतेची आई आहे' हे पुरवठा व कल्पकता यांचे भाऊ बहिणीचे नाते आहे. हे नाते पाळण्याची दक्षता सर्व लेखकांनी घ्यायला नको का ? प्रश्न : (1) मराठी भाषेविषयी कोणते आक्षेप घेतले जातात ? (2) प्रस्तुत उताऱ्यांत आलेली प्रसिद्ध व महत्त्वाची दोन तत्त्वे कोणती ? (3) उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
- खालील पद्यांश वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा – संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। 1 ।। ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।। 2 ।। नामा तयाचा किंकर । तेणे रचिले ते आवार ।। 3 ।। जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।। 4 ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। 5 ।। बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केले बोजा ।। 6 ।। प्रश्न : (i) ज्ञानेश्वरांनी कशाचा पाया रचला ? (ii) हे काव्य कुणी रचले ? (iii) भागवत धर्माची इमारत कोणकोणत्या संतांमुळे उभी राहिली ?
- खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (अ) केशवने कोलकाता येथे शिक्षण घेण्यास जाण्याचे कां ठरविले ? (ब) आचार्य विनोबांच्या मते समाजात स्त्री-पुरुष भेदभाव कसा केला जातो ?
- (अ) 'श्री' गिरवतांना लहानपणी लेखक (वि.स. खांडेकर कां घाबरला ? (ब) म.फुले शेतकऱ्यांचे चित्र कसे रेखाटतात ?
- सविस्तर उत्तरे लिहा – (अ) लेखकाच्या मनामध्ये एकटे पणाची क्षुद्रतेची भावना कां निर्माण झाली ? ती क्षुद्रपणाची व एकटे पणाची भावना कशी नाहीशी करणार ? (ब) आचार्य विनोबांच्या मते गावाचे गोकुळ केव्हा होईल ?
- (अ) आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे – वरील पद्यांशाचा ससंदर्भ अर्थ स्पष्ट करा. (ब) आपल्या लाडक्या म्हशीशी नागू झोपेत काय बोलला ?
- (अ) “एका तळ्यात होती" या कवितेचे कवी कोण ? बदकाच्या उदाहरणातून मानवी स्वभावाचे कोणते विशेष कवीने सांगितले आहे ? (ब) खालील पंक्तीचा ससंदर्भ अर्थ स्पष्ट करा या देशाची पवित्र माती इये वीर वर जन्मा येती तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका ।।
- (अ) 'बलसागर भारत होवो' या कवितेत कवीने कोणती आकांक्षा व्यक्त केली आहे ? त्यासाठी कोणता त्याग करावयाची तयारी दाखविली आहे ? (ब) कवयित्री शांता शेळके या देशाच्या मातीची महती कशी सांगत आहे ? कवितेचे नाव सांगा.
- तुम्ही तिघा मित्रांनी टी.व्ही. पर भारत व पाकिस्तान यांच्यातील एक दिवसीय क्रिकेट सामना बघितला. भारत जिंकला या संबंधीचा तुम्हा तिघा मित्रांचा संवाद सुमारे 8 ते 10 वाक्यात लिहा.
- खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 शब्दांचा निबंध लिहा – (अ) संतांचे महत्त्व (ब) मोबाईल – शाप कि वरदान (क) आमचे शेजारी (ड) माझा आवडता सण
- तुमच्या पाठ्य पुस्तकातील कोणता धडा तुम्हाला अधिक आवडला ? कां ? धड्याचे व लेखकाचे नाव सांगा.
- नवीन खरेदी केलेली पुस्तके फाटकी निघाली, त्याबद्दल पुस्तक विक्रेत्यास तक्रार पत्र लिहा – किंवा तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात अशी कल्पना करून 'पाणी टंचाई' बद्दल तहसिलदारास पत्र लिहा.
- पुढील उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा – मनुष्याच्या आहारवस्तू कष्टसाध्य आहेत. त्यांची उपभोग इच्छा अमर्याद आहे एवढ्या दोन गोष्टी स्पष्टपणे ध्यानात आल्या म्हणजे त्यास इतर प्राण्यांपेक्षा शेकडोपट अधिक उद्योग कां केला पाहिजे हे सहज समजणार आहे. हे ज्यास पक्के समजून येईल, तो निरूद्योगी होणार नाही. तो उद्योगी होईल. इतकेच नाही तर इतरासही उद्योग करण्यास प्रवृत्त करील. विशेष उद्योगी मनुष्याचे सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य घालविणे शक्य आहे. पण कोणत्याही कारणाने उद्योगी मनुष्याशी गाठ पडल्यास एक तर त्याप्रमाणे उद्योग कण्यास, किंवा त्याच्या अधीन होऊन तो ठेवील त्या स्थितीत राहण्यास तयार झाले पाहिजे. आमचे भवितव्य आमच्या उद्योगावर अवलंबून आहे.
- सुधाकर गायकवाड यांच्या घरातील एकूण उत्पन्नापैकी 25% उत्पन्न शेतीव्यवसायातून, 35% उत्पन्न तेल गिरणीतून, 25% दुकानदारीतून व 15% उत्पन्न दुधाच्या व्यवसायातून मिळते. हे वर्तुळालेखाच्या सहाय्याने दाखवा.
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
--- Content provided by FirstRanker.com ---
This download link is referred from the post: NIOS 10th Class (Secondary) Last 10 Years 2010-2020 Previous Question Papers || National Institute of Open Schooling
--- Content provided by FirstRanker.com ---